राज्यांकडे एक कोटींपेक्षा अधिक लसींचा साठा, केंद्र सरकारची माहिती

Share This News

ज्यांकडे एक कोटींपेक्षा अधिक कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा आहे अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. तसेच पुढील तीन दिवसांत अजून 20 लाख लसींचा पुरवठा केला जाईल असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

#LargestVaccineDrive

GoI has provided more than 16.33 cr #COVID19Vaccine doses to States & UTs for free

More than 1 cr doses still available in stock with them@PMOIndia @MoHFW_INDIA #Unite2FightCorona#IndiaFightsCorona pic.twitter.com/vFFVVqMX5e

— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) April 30, 2021


देशात कोरोनाचा प्रादुर्भावा दिवसेंदिवस वाढत आहे. एक मे पासून 18 वर्षाहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. पण महाराष्ट्र आणि दिल्लीसह अनेक राज्यांत लसींचा तुटवडा जाणवत आहे. पण राज्यांकडे एक कोटींपेक्षा अधिक लसींचा साठा आहे असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. तसेच पुढील तीन दिवसांत अजून 20 लाख लसींचा पुरवठा केला जाईल असेही हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेश राज्यांना आतापर्यंत 16 कोटी 33 लाख 85 हजार 30 कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्या आहेत. त्यात 15 कोटी 33 लाख 56 हजार 503 लस वापरण्यात आल्या आहेत. यामध्ये वाया गेलेल्या लसींचाही समावेश आहे. सध्या राज्यांकडे 1 कोटी 28 हजार 527 कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा आहे. पुढील तीन दिवसांत 20 लाखपर्यंत लसींचा पुरवठा होईल असे केंद्राने म्हटले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.