सावनेरकरांनो स्वसुरक्षेसाठी घरीच रहा, अन्यथा कडक कार्रवाहीस तयार व्हा, सावनेर  पोलिसांचा अखेरचा इशारा 

Share This News

सावनेर पोलीस स्टेशनचे ठानेदार मारुती मुळूक यांनी शुक्रवारी आधिनस्थ अधिकारी कर्मचारी व नगर परिषदेचे कर्मचारी आदींना सोबत घेऊन गांधी चौक,खापा चौक,गडकरी चौक,बाजार चौक ,होळी चौक इतर मार्केट परिसरात संयुक्तिक दौरा व मोठी कार्रवाई केली , नव्याने लागु करण्यात आलेल्या  ‘लॉकडाऊन’ व कड़क संचारबंदीचा अर्थ  नागरिकांनी अत्यावश्यक कामा शिवाय घरातून बाहेर पडू नये, असा आहे. परंतु दुर्देवाने अनेक दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहने रस्त्यांवर दिसून येत आहे. नागरिक घराबाहेर दिसून येत आहे.वाढत्या कोरोनावर नियंत्रणासाठी नागरिकांनी घरातच राहणे अपेक्षित आहे. त्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला . मात्र दुर्देवाने अजूनही नागरिक घराबाहेर दिसून येत आहे. नागरिकांनी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी व आरोग्यासाठी घरात राहून सहकार्य करावे अन्यथा नागरिकांना सक्तीने घरात डांबून ठेवावे लागेल, असाअखेरचा  इशारा सावनेर चे थानेदार यांनी दिला.यापूर्वीही नागरिकांना घरातून बाहेर पडू नये, अशी वारंवार विनंती केली. त्याबाबत गांभीर्य न दाखविल्याने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा  लागू करण्यात आला. मात्र नागरिक रस्त्यांवर फिरत असल्याने कोरोनाचे गांभीर्य त्यांनी लक्षात घेतल्याचे दिसत नाही, अशी खंत पोलीस निरीक्षक यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षणासाठी या सर्व उपाययोजना केल्या आहेत. सुरक्षेसाठी नियम पाळण्याची गरज आहे. परंतु नागरिक ऐकत नसतील तर सक्तीने त्यांना घरात कोंडावे लागेल, असे पो.नी.मुळुक म्हणाले.पुढचे आदेश पर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. परिस्थिती नियंत्रणात असली तरी ती कायम राहण्याची गरज असून यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घरातच राहावे, असेही ते याप्रसंगी म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.