देशी व विदेशी दारूसाठा जप्त, एक आरोपी अटकेत

Share This News

नागपूरवरून चंद्रपूरमार्गे अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असताना नाका-बंदी दरम्यान पोलिसांनी वाहनासह ३ लाख ९0 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारला रात्रीदरम्यान करण्यात आली. आकाश महादेव खंडाळकर (वय २७ वर्षे) रा. भद्रनाग वॉर्ड असे आरोपीचे नाव आहे.
सदर आरोपी गेल्या कित्येक दिवसांपासून या परिसरात अवैध दारूचा व्यवसाय करीत आहे. चारचाकी गाडी (क्रमांक एम एच १४ डी टी ५४५३) या वाहनाने नागपूरहून चंद्रपूरकडे देशी व विदेशी दारूसाठा आणत असल्याची भद्रावती पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, त्या आधारे सुमठाणा परिसरात नाकाबंदी करून वाहनासह आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ९0 हजाराचा दारूसाठा व वाहन असा ३ लाख ९0 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात केशव चिटगिरे, शशांक बदामवार, निकेश ढेंगे, रोहित चीटगिरे, दिलीप लभाने यांनी केली.
     

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.