पश्चिम विदर्भात कडक संचारबंदी, नागपुरात पोलिस रस्त्यांवर | Strict curfew in West Vidarbha, police on roads in Nagpur

Share This News

नागपूर : रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीची कडक अंमलबजाणी करण्यात येत आहे. आता प्रतिबंधात्मक आदेश लागू झाल्याने नागपुरातही पोलिस रस्त्यांवर उतरले आहेत.
सोमवार, २२ फेब्रुवारीपासून मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बाजारपेठ रात्री नऊ वाजता बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर शहरातील सर्व पोलिस आयुक्त आपल्या ताफ्यासह रस्त्यांवर उतरले. शहरातील सीताबर्डी बाजारात ग्राहकांची सर्वाधिक गर्दी असते. त्यामुळे परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता साहू यांनी संपूर्ण बर्डीचा परिसर पालथा घालत व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले.
पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, अचलपूर, वर्धा येथे सायंकाळपासून पोलिसांची वाहने सायरन वाजवित गस्त घालत आहेत. रात्री आठ वाजेपासून पोलिस रस्त्यांवरून गस्त घालत पोलिस नागरिकांना घरी जाण्याचे आदेश देत आहेत. संचारबंदी काळात फिरणाऱ्यांविरोधात पोलिस कारवाईही करीत आहेत. याशिवाय विनामास्क फिरणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.