नागपुरात प्रतिबंध कडक; शाळा-कॉलेज बंद

Share This News

नागपूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात प्रतिबंध आणखी कडक करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवार, २२ फेब्रुवारीला केली.
सोमवारी झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीनंतर डॉ. राऊत यांनी प्रतिबंध कडक करीत असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, आठवडीबाजार बंद, मंगल कार्यालय, हॉल, लॉन, रिसॉर्ट ७ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शनिवार, रविवार बाजापेठ व आठवडीबाजार बंद असतील. नागपूर जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री ९ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये केवळ ५० टक्के क्षमतेने लोकांना प्रवेश असले असे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. कोरोना केअर सेंटर अधिक क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या भागांमध्ये कंटेन्मेट झोन तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याचे डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी विभागीय महसूल आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आदी उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.