नागपुरात कडकडीत बंद; पोलिस रस्त्यांवर |Strictly closed in Nagpur; Police on the streets

Share This News

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने शनिवार, रविवार दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शनिवार, २७ फेब्रुवारीला नागपूर शहरातील सर्वच बाजारपेठा, रस्ते निर्मनुष्य होते.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी शहरातील रस्त्यांवरून गस्त घालत होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजताच शहरातील बाजारपेठा बंद करण्यात आल्या. आता सर्व व्यवहार सोमवारी सकाळी सुरळीत होणार आहे. नागपूरकर घराबाहेर पडू नये, रस्त्यांवर गर्दी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. गेल्या लॉकडाउनमध्ये पोलिस कारवाईचा अनुभव असल्याने नागपूरकरांनीही शनिवारी घराबाहेर पडणे टाळले. शहरातील हॉस्पीटल, मेडिकल शॉप, अत्यावश्यक सेवा मात्र सुरळीत सुरू होत्या. खासगी कार्यालय व सरकारी कार्यालयांमधील कामकाज मात्र बंद होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.