विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नाही

Share This News

राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होत आहे. कोरोना वाढण्याची भीती असल्याने काही शहरांत आणि जिलंमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून संभ्रम निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मुद्यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माहिती देत शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत येण्याच सक्ती नसेल, विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात, असे स्पष्ट केले आहे.
राज्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवारपासून (२३ नोव्हेंबर) शाळा सुरू होत असून, शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आलेले आहेत. यासंदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी माध्यमांच्या प्रतिनिधी संवाद साधताना सविस्तर माहिती दिली. सरकारने जबाबदारी घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एखाद्या ठिकाणी जास्त उद्रेक झाला, तर स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्यास सांगितलेले आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाच्या सचिवांशी माझी चर्चा झाली आहे. मुलांना शाळेत पाठवणे सक्तीचे नसून, ऑनलाईन शिक्षण चालू राहील, अशी माहिती तनपुरे यांनी दिली.
मुंबई, ठाणे, पुण्यात शाळा बंदच राहणार
शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच दुसरीकडे राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपयर्ंत बंद ठेवण्याचे आदेश बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी काढले आहेत. त्याचबरोबर ठाणे आणि पनवेलमधील शाळाही बंद राहणार आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.