शाळा शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास बंद

Share This News

शाळेची फी भरली नाही म्हणून ऑनलाईन वर्गातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. नागपूरच्या वर्धमान नगर परिसरातील स्वामीनारायण शाळेने फी जमा केली नसल्याने सुमारे ५०० विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून बाहेर केल्याचा आरोप पालकांनी केला. शाळा प्रशासनाच्या या निर्णयाचा विरोध करीत पालकांनी शाळेबाहेर आज आंदोलन केलं. कोरोना मुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद पडलेल्या शाळेचे पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्ग करोना नियमांसह उघडण्याची परवानगी शाळांना देण्यात आली आहे. करोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळांतर्फे ऑनलाईन वर्ग यापूर्वीच सुरु करण्यात आले होते. शाळा बंद असूनही शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांकडे विद्यार्थ्यांची फी जमा करण्याचा तगादा लावला होता. ज्या विद्यार्थ्यांनी शाळांची फी जमा केली नाही अशा सुमारे ५०० विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस बंद करण्यात आले आहेत. या विद्यर्थ्यांना ऑनलाईन वर्गामधून बाहेर काढण्यात आल्याने पालकांनी स्वामीनारायण शाळेत आंदोलन केलं. पालकांच्या आंदोलनानंतर शाळा प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.