नागपुरातील पुलावर पुन्हा स्टंटबाजी, पोलिसांचा हिसका

Share This News

नागपूर : नागपुरातील विविध उड्डाणपूल आणि अंडरब्रीजच्या परिसरात हुल्लडबाज तरुणांनी वाहनांवर स्टंटबाजी करण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. या स्टंटबाज तरुणांविरोधात पोलिसांनी मोहिम हाती घेतली आहे. शनिवार, २० फेब्रुवारीला वंजारीनगरातील पुलावर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवित त्यांची वाहने ताब्यात घेतली.
२६ जानेवारीला वंजारीनगर पुलावरच काही कारचालक तरुणांनी घातक स्टंट केले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या युवकांची वाहने जप्त करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा काही तरुण याच पुलावर स्टंटबाजी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे ताफा तातडीने तेथे पोहोचला. त्यावेळी स्कुटीवर काही तरुण स्टंटबाजी करीत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करीत या युवकांची वाहने ताब्यात घेतली. आता शहरातील उड्डाणपुलावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.