मार्चपासूनच उन्हाळा तापणार; अकोला, चंद्रपूरसाठी अलर्ट Summer will heat up from March; Alert for Akola, Chandrapur

Share This News

नागपूर : यंदाचा उन्हाळा मार्चपासूनच तापणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या नागपूर वेधशाळेने व्यक्त केला आहे. मार्चमध्येच अकोला आणि चंद्रपुरातील पारा चाळीशी ओलांडू शकतो, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एप्रिल, मे आणि जून महिन्यात उन्हाने विदर्भातील लोकांची लाहीलाही होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा प्रकोप जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदा मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढण्याचे संकेत आहेत.


अरबी समुद्रात उष्ण वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आर्द्रतेत वाढ होत आहेत. परिणामी नागपूर, अकोला, वर्धा, गोंदिया आणि यवतमाळ आदी शहरांमध्ये ३८ ते ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ३९ अशं सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. अकोल्यात मार्च महिन्यातील उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे विदर्भातील इतर जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक आहे. चंद्रपुरातही ३९ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भाचे तापमान सर्वसामान्य तापमानाच्या तुलनेत ४ ते ५ अंश सेल्सिअस अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मार्चचा दुसरा आठवडा अधिक तापू शकतो, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.