अग्निकांडानंतरही सीरमकडून तीन देशांना लसीचा पुरवठा
पुणे |
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची एक इमारत गुरुवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असतानाही या अग्नि दुर्घटनेनंतर शुक्रवारी सीरम इन्स्टिट्यूटने म्यानमार, सेशेल्स आणि मॉरिशेस या देशांना ह्यकोव्हिशिल्ड लसीचा साठा पाठवून दिला. इमारतीचे बांधकाम सुरु होते. या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने या आगीमुळे कोव्हिशिल्ड लस निर्मितीच्या उत्पादनावर कुठलाही परिणाम झालेला नाही. सध्या सर्वांचेच लक्ष या जीवरक्षक लसीकडे लागले आहे. देशात शनिवारपासूनच लसीकरणाला सुरुवात झालीय. आतापयर्ंत लाखो लोकांना या लसीचे डोस देण्यात आले आहेत. सर्व सरकारी संस्था आणि लोकांना मी हे निश्चितपणे सांगू शकतो की कोव्हिशिल्डच्या निर्मितीला कोणताही फटका बसलेला नाही. कोव्हिशिल्डची निर्मिती अनेक इमारतींमध्ये केली जाते. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अशी एखादी घटना घडलीच तर लस सुरक्षित रहावी म्हणून मी मुद्दाम अशाप्रकारची रचना करुन ठेवली आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी ट्विटरवरुन दिली आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी पुणे पोलीस आणि अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत. आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना सीरम इन्स्टिट्यूटकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृतांपैकी दोन जण पुण्यातील असून अन्य दोन जण उत्तर प्रदेश व एकजण बिहारमधील आहे. |