आघाडी सरकार, अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, याचिका फेटाळल्या, सीबीआय चौकशीचा मार्ग मोकळा

Share This News

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिका महाराष्ट्र सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावल्या असल्याने परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोप प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकत माजी गृहमंत्री तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केले आहेत. या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाला महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांनी स्वतंत्र याचिका दाखल करीत आव्हान दिले होते. गुरुवारी या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली व न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या. आघाडीचे सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दृष्टीने हा मोठा धक्का मानला जात आहे.
याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.” तुमच्यावर आरोप करणारा शत्रू नव्हता; तो जणू काही तुमचा उजवा हात होता. त्यामुळे दोघांची चौकशी झालीच पाहिजे”, असे निरीक्षण न्यायमूर्ती संजय कौल यांनी नोंदविले आहे, हे विशेष.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.