महाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरात वीरमरण

Share This News

चाळीसगाव : जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना जळगावचे सुपुत्र आणि बीएसएफचे शूर जवान अमित पाटील यांना वीरमरण आले. चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील ते रहिवासी होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि लहान भाऊ असा परिवार आहे. शहीद अमित पाटील हे वाकडी येथील शेतकरी साहेबराव नथू पाटील यांचे ज्येष्ठ पुत्र होते. सन २0१0 मध्ये ते सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) भरती झाले होते. सध्या जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना आठ दिवसांपूर्वी अचानक त्यांच्या अंगावर बफार्ची लादी कोसळल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतू आज (बुधवारी) सकाळी दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.