आत्मसमर्पित माओवाद्यांना मिळाले हक्काचे घर

Share This News

गडचिरोली : बंदूक हातात घेऊन माओवादी चळवळीत अनेक वर्ष काम केल्यानंतर शस्त्र खाली ठेवत आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना हक्काचे घरकुल मिळाले आहे. गडचिरोली पोलिसांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या घरकुलांचा ताबा संबंधित आत्मसमर्पित माओवाद्यांना देण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील ३२० आत्मसमर्पित माओवाद्यांना पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, सहाय्यक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत घरकुलांचा ताबा देण्यात आला. ८१ आत्मसमर्पित माओवाद्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले. हिंसेचा मार्ग सोडून लोकशाहीच्या व प्रवाहात आलेल्या युवक-युवतींचे प्रशासनाच्यावतीने अधिकाऱ्यांनी स्वागत केले. आत्मसमर्पित माओवाद्यांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभे राहिल असे पोलिस अधीक्षक गोयल यावेळी म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील गडचिरोली पोलिसांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात शुभेच्छा संदेश दिला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.