स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पदाधिकारी निघाला चोर

Share This News

बुलडाणा : बुलडाणा: जिल्ह्यातील शेवटचं टोक असलेल्या जळगाव जामोद तालुका हा वन संपत्तीने नटलेला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी आणि आदिवासी बहुल म्हणूनही हा भाग ओळखला जातो. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात सालई गोंदाची तस्करी केली जाते. अशाच सालई गोंदाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तस्कराला प्रयत्न हाणून पाडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आल असलं तरी आरोपी मात्र, घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला आहे.


घटनास्थळावरून आरोपीच्या गाडीतून २६५ किलो सालई गोंद जप्त करण्यात आला असून इंडिका गाडीही जप्त करण्यात आली आहे. तेजराव अशोक लोणे असे आरोपीच नाव असून आणि हा आरोपी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उपतालुका प्रमुख आहे. जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा ते निमखेडी रस्त्यावर वन विभागाचे दबा धरुन बसले. भिंगाराकडून जळगांवकडे येणाऱ्या रस्त्याने चॉकलेटी रंगाची टाटा इंडिगो कार येत असल्याचे वन अधिकाऱ्याना दिसली. कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता गाडीतील तस्कराने वनअधिकारी व वनकर्मचारी यांना पाहून गाडी तेथेच सोडली आणि तो जंगलातून पसार झाला. गाडीची तपासणी केली असता त्या गाडीतून वनोपज असलेला सालई गोंदाचे ८ कट्टे आढळून आले. ही कारवाई आज पहाटे ५ वाजता करण्यात आली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.