बुलडाण्यात भीषण अपघात, 2 मित्र ठार, 3 जखमी

0

भरधाव स्विफ्ट कार पळसाच्या झाडावर धडकली

बुलडाणा. जिल्ह्यातील चिखली साकेगाव (Chikhali Sakegaon in Buldana district ) मार्गावरील वाघापूर जवळ (Near Waghapur ) कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने स्विफ्ट डिझायर कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली (Swift Dzire car hit a tree). या भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला (Two close friends died on the spot in the accident ) तर तीघे गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. माजी नगरसेवक गोपाळ देव्हडे यांचे लहान बंधू सुनील देव्हडे आणि हर्षद पांडे अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. यश वाधवाणी, आकाश चिंचोले, पप्पू राजपूत हे तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चिखली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये समृद्धीमार्ग असो किंवा शहरातील अन्य मार्ग अपघाताचे सत्र सतत सुरू आहे. गुळगुळीत रस्ते आणि वाहनांचा अनियंत्रित वेग यामुळे भीषण अपघात घडत आहेत.

चिखली येथील माजी नगरसेवक गोपाल देव्हडे यांचे लहान बंधू सुनील देव्हडे यांच्यासह आणखी एकाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. साकेगावच्या पप्पू राजपूतला घरी सोडण्यासाठी स्विफ्ट डिझायर गाडीने पाचही जण जात होते. वाघापूर जवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली असलेल्या पळसाच्या झाडावर आदळली. अपघातने झाडही जमिनीतून मुळासकट उखडले गेले. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तिघा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींपैकी एकाची प्रकृती अतिगंभीर असून तो मृत्यूशी झुंज देत असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. दोघांचे मृतदेह तपासणीसाठी चिखलीच्या उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताने चिखली परिसरात शोककळा पसरली आहे. जिवलग मित्रांच्या अपघातमध्ये मृत्यु झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पदवीधरच्या मतदानाची लगबग सुरू असताना या अपघाताचे वृत्ता आले आणि अवघा जिल्हाच हादरला.

अपघातांची मालिका
काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. 20 जानेवारीच्या सकाळी नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात 20 ते 23 प्रवासी जखमी तर एक प्रवासी ठार झाले होते.