काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

Share This News

श्रीनगर : 

काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या आरओपीला (रोड ओपनिंग पार्टी) लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी पाजलपोरा-बिजबेहेरा येथे एका वाहनात आईडी स्फोट घडवून आणला. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही वाहनांचे यात नुकसान झाले आहे.

दहशतवाद्यांनी एका वाहनाच्या आत आईडी लावला होता. सुरक्षा दलाच्या वाहनांचा ताफा येताच त्यांनी हा स्फोट घडवला. स्फोटानंतर पाजलपोरा परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून, शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. 

सुरक्षा दलांना लक्ष्य करून लोकांमध्ये भीती पसरवण्यासाठी सीमेपलीकडून दहशतवाद्यांकडून असे षडयंत्र रचले जात असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.