मुंबईत टेस्टिंग वाढवलं पाहिजे : देवेंद्र फडणवीस

Share This News

अजूनही आभासी जगात जाणे योग्य होणार नाही.रुग्ण कमी झालं तर आनंदच आहे आणि कमी झालेच पाहिजे,पण अद्यापही दररोज 65 हजार रुग्ण पाहायला मिळताहेत. नागपूर, मुंबई, पुण्यात इन्फेक्शनचा रेशो 15 टक्क्यांच्या वर आहे. मुंबईत टेस्टिंग कमी होत आहे ते वाढवलं पाहिजे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देत कोविड परिस्थितीविषयीचा आढावा घेतला. यावेळी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले आदी उपस्थित होते,यावेळी फडणवीस यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत आयसोलेशन कक्षाला भेट दिली.

रुग्ण मृत्युमुखी पडताहेत त्या आकड्यांच रीकन्सलेशन झालेलं नाही. त्यामुळं नेमका अंदाज  येत नाही. पॉझिटिव्ह साइन असल्यास त्याच स्वागत करू.लॉकडाउनबाबत सरकार काय निर्णय घेते यावर भाजप निर्णय घेईल.आम्ही जनतेसोबत आहोत, असंही फडणवीस म्हणालेत. अधिकाऱ्यांशी चर्चा करत अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी साहित्य, सिलिंडरची आवश्यकता आहे. बेड वाढवण्याची गरज असून मनुष्यबळ भरण्याकड लक्ष द्यावा. जिल्ह्यात लांबच्या भागात आरोग्य केंद्र सुविधा उभाराव्यात, असही फडणवीस म्हणालेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.