ठाणे जिल्ह्यात कलापथकांच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृती

Share This News

कोरोना आजाराविषयी जनतेचे प्रबोधन करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राज्यभर कलापथकांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांचे ठाणे जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे. लोककला आणि पथनाट्यांद्वारे शासनाने कोरोनाला आळा घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना व नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जनप्रबोधन करण्यात येणार आहे. 
 जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हयातील सात तालुक्यातील 140 गावांमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत आचारसंहिता लक्षात घेऊन निवडणूक नसलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात 4 संस्थांना शासनाने प्राधिकृत केले आहे . या संस्था मार्फत 40 कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत. कलापथकांच्या माध्यमातून कोरोना काळात घ्यावयाची खबरदारी, पाळावयाचे नियम याबाबत गाणी, नाटक, भारुड, पोवाडा, बतावणी, गवळण या माध्यमामातुन जनजागृती करणार आहेत. हे कलापथक जिल्ह्यातील गावांना भेटी देऊन प्रबोधन करणार असल्याचे कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.