परमबीर सिंह यांचे ते पत्र म्हणजे भाजपचे कटकारस्थान, शिवसेनेचा गंभीर आरोप

Share This News

मुंबईः गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप करणारे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे पत्र हा व्यापक कटाचा भाग असल्याचा आरोप शिवसेनेने आपल्या मुखपत्राच्या माध्यमातून केला आहे.


गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्ष आणि केंद्र सरकारने मिळून हा कट रचल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. त्यानंतर दोन दिवसात परमबीर सिंह यांचे पत्र आले, याकडे शिवसेनेने लक्ष वेधले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नसल्याचा ठपका ठेऊन राष्ट्रपती राजवटीचा हातोडा चालविण्याचा उद्देश यामागे दिसून येत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर केला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी वापर राज्यात सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यपालांकडून वेगळेच उपद्व्याप सुरु असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.