फडणवीसांचा तो अहवाल म्हणजे भिजलेला लवंगी फटाका

Share This News

संजय राऊत यांनी उडविली खिल्ली, सरकार अडचणीत नसल्याचा दावा
मुंबई: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना दिलेला तो अहवाल म्हणजे भिजलेला लवंगी फटाका असल्याची खिल्ली शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडविली आहे.
राज्यातील पोलिस बदल्यांच्या रॅकेटशी संबंधित माजी पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांचा अहवाल फडणवीस यांनी काल मंगळवारी केंद्रीय गृहसचिवांना सादर केला. त्यात कॉल रेकॉर्डींगचा डेटा आणि कागदपत्रांचा देखील समावेश आहे. या अहवालाने सरकार अडचणी येण्याची शक्यता संजय राऊत यांनी फेटाळून लावली. ते काहीतरी कागद घेऊन आले आणि गृहसचिवांना भेटले आहेत. त्यात सरकार अडचणीत येण्यासारखे काहीही नाही. त्याची योग्य काय ती दखल मुख्यमंत्री घेतील, असे राऊत म्हणाले. फडणवीस जो काही बॉम्ब घेऊन आले होते, तो निव्वळ भिजलेला लवंगी फटका आहे. त्या फटाक्याला वात देखील नव्हती. बंगालप्रमाणे महाराष्ट्र दिल्लीतही खेला होबे सुरु असून त्यामुळे लोकांचे विनापैशाने मनोरंजन होत असल्याचे ते म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.