दहावी, बारावीच्या परीक्षा होणार एप्रिलमध्ये

Share This News

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शैक्षणिक संस्था २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश विविध जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रेणेने काढले आहेत. अशात दहावी आणि बारावीची शालांत परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात येणार असल्याचे बोर्डाचे बुधवारी जाहीर केले. परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही बोर्डाने घोषित केले आहे.
बारावीच्या परीक्षेला २३ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. दहावीच्या परीक्षेला २९ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ एप्रिलपासून सुरू होणारी बारावीची परीक्षा २१ मे पर्यंत चालणार आहे. २९ एप्रिल रोजी सुरू होणारी दहावीची परीक्षा २० मे पर्यंत घेण्यात येणार आहे. राज्य परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक बोर्डाने उपलब्ध करून दिले आहे. नागपूर विभागीय़ परीक्षा मंडळानेही परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कोरोनाचा धोका पाहता यंदा सुरक्षित अंतर राखत बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सॅनिटायझर पुरविण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा कक्षात २० ते २५ विद्यार्थ्यांनाच बसविण्यात येणार आहे.

लवकर होणार पेपर
कोरोनाची परिस्थिती आणि उन्हामुळे यंदा पेपरला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात करण्यात येणार आहे. आतापर्यंत दरवर्षी ११ वाजता पेपर सुरू होत होते. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सकाळी ९ वाजताच पोहोचावे लागणार आहे. दुपारच्या सत्रातील पेपर ३ ते ६ या वेळेत होणार आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.