अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशन,केंद्रिय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते मनिष कुमार यांना पुरस्कार प्रदान
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं ६६ वे राष्ट्रीय अधिवेशन या वर्षी नागपूरात संपन्न होत आहे. या अधिवेशनात देशाभरातून अभाविपचे कार्यकर्ते प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले आहेत. शुक्रवारी या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते पार पडलं. त्यानंतर शनिवारी या अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची प्रामुख्याने उपस्थिती पहायला मिळाली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कृषी क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे उडिसाचे मनिषकुमार यांना यंदाच प्राध्यापक यशवंतराव केळकर युवा पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यातं आला. यावेळी नितिन गडकरी यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना स्वतःच्या कार्यकर्ता पणाची आठवण करून दिली. शिवाय परिषद हे बुलेट ट्रेन सारखे आहेत, अनेक विद्यार्थी या ट्रेन मधे चढतात तर काही विद्यार्थी उतरत असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.
शनिवारी शहरातील सुरेश भट सभागृहात या अधिवेशनाचा दुसरा दिवस संपन्न झाला. यावेळी कृषी क्षेत्रात काम करणारे सर्वोत्तम कार्यकर्ता म्हणून उडिसाचे मनिषकुमार यांना प्राध्यापक यशवंतराव केळकर युवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नितिन गडकरी यांनी उपस्थित अभाविप कार्यकर्त्यांना कृषी क्षेत्रात युवांचे योगदान कसे असावे याबद्दल मार्गदर्शन केलं.