प्रामाणिक मजुराने सापडलेली ९७ हजारांची रक्कम पोलिसांत केली जमा

Share This News

अमरावती : शासनाच्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुराने त्याला सापडलेले पाचशे रुपयांच्या ९७ हजारांच्या नोटांचे बंडल पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दिले आहे. रामदास जिचकार असे या मजुराचे नाव आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील रामदास गोमाजी जिचकार हे सामाजिक वनिकरणाच्या कामावर मोलमजुरी करतात. अशातच आज सकाळी दापोरी ते मायवाडी रस्त्यावरील झाडांना पाणी टाकण्याकरिता लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आणण्याकरिता ते गेले असता त्यांना त्या पाण्यामध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल चिखलामध्ये पडून असल्याचे आढळून आले. पाचशे रुपयाच्या एवढ्या मोठ्या नोटा पाहून त्या व्यक्तीच्या मनात स्वार्थ निर्माण होणे साहजिक होते. सापडलेली इतकी मोठी रकम पाहून कुणालाही लोभ सुटणे साहजिकच. पण मोलमजुरी करणाऱ्या रामदास यांच्यातील प्रामाणिकपणा तेथे जागा झाला. लागलीच त्यांनी तेथील वनपाल एस एस काळे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सदर नोटाचे बंडल घेऊन रामदास यानी मोर्शी पोलीस स्टेशन गाठले व घडलेला प्रकार सांगून त्या नोटा पोलिसांत जमा केल्या. रामदासने दाखवलेल्या प्रामाणिकबद्धल मोर्शी पोलिसांनी त्यांचा सत्कार केला.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.