वाझेच्या डायरीतील बारमालक अडकले चौकशीच्या फेऱ्यात

Share This News

मुंबई : ​​माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी पोलिस आयुक्त परमबीर व सचिन वाझे यांच्या खंडणी आरोप प्रकरणातील सीबीआयचा तपास आता बोरिवलीतील बार मालकाभोवती तपास फिरू लागला आहे.
सीबीआयनुसार, एनआयएने मागील आठवड्यात गिरगाव भागात टाकलेल्या धाडीत एक डायरी सापडली होती. त्या डायरीत विविध प्रकारचे आकडे लिहिण्यात आले होते. आकड्यांसह महेश शेट्टी या व्यक्तीचे नाव आढळले. हे आकडे खंडणीचे असून शेट्टीचा त्या खंडणीशी संबंध असल्याचा सीबीआयचा संशय आहे. त्यानुसार सीबीआयने शेट्टीबाबत तपास सुरू केला आहे. याखेरीज मुख्य तक्रारदार मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, पोलिस उपायुक्त राजू भुजबळ व निलंबित सहपोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचीही सीबीआयने चौकशी केली आहे. त्यांचा जबाबदेखील नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात शेट्टी, वाझे, परमबीर सिंह व अनिल देशमुख यांचा नेमका संबंध काय, त्या संबंधाची साखळी शोधण्याचा प्रयत्न सीबीआयकडून सुरू आहे. त्यासाठीच सीबीआयचे पथक लवकरच एनआयएच्या चमूशीदेखील बोलणार आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.