नागपूरातील समता प्रतिष्ठानची चौकशी The big role of clean energy in driving the growth of the economy: Dharmendra Pradhan

Share This News

मुंबई : नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कामांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल. याप्रकरणी प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
आमदार सुनील प्रभू यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही या मुद्द्यावर सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी केली. आमदार नाना पटोले यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या आमदारांनी सरकारने योग्य ते उत्तर द्यावे, अशी मागणी केली. त्यामुळे सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांनी फडणवीस, मुनगंटीवार, प्रभू यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेमार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त जे कार्यक्रम घेण्यात आले त्याच्या खर्चामध्ये ताळमेळ लागताना दिसत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विशेष पथकामार्फत चौकशी केली जाईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे मुंडे म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.