बोदलकसा-मंगेझरी-खाडीपार रस्ता उखडला The Bodalaksa-Mangezhari-Khadi road was dug up

Share This News

तिरोडा:नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल जंगल परिसर म्हणून ओळखल्या जाणार्‍या परिसरातील बोदलकसा-मंगेझरी-खाडीपार हा डांबरीकरणाचा मुख्य रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे ये-जा करणार्‍या लोकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकदा अपघातही घडले आहेत. मात्र याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

बोदलकसा-मंगेझरी-खाडीपार या मुख्य मार्गाचे मागील अनेक वर्षांपासून गिट्टी व डांबर उखडले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा मुख्य मार्ग असल्यामुळे या रस्त्याने अवजड वाहने नियमित धावतात. त्यामुळे रस्त्याची स्थिती आणखी दयनीय झाली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.