गादा शिवारात तरुणाचा मृतदेह आढळला
कामठी : नागपूर-जबलपूर महामार्गावरील गादा शिवारात सर्व्हिस राेडलगत तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.
कामठी : नागपूर-जबलपूर महामार्गावरील गादा शिवारात सर्व्हिस राेडलगत तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. मंगेश आनंदराव ठाकरे (३०, रा. गादा, ता. कामठी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गादा शिवारातील ढाब्याच्या मागील बाजूस सर्व्हिस राेडलगत तरुण मृतावस्थेत पडून हाेता.