कळमेश्वरात आढळला मृतदेह The body was found at Kalmeshwar

Share This News

कळमेश्‍वर
कळमेश्‍वरजवळील सावंगी शिवारात बुधवारी (२0 जानेवारी) दुपारी ४ वाजता एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून, कळमेश्‍वर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद केली असलीतरी नागरिकांमध्ये घातपाताची चर्चा सुरू आहे.
वसंतराव पुसदकर (वय ५१) रा. सावंगी मृतक इसमाचे नाव असून, अरुण सावरकर नागपूर यांची सावंगी शिवारात २0 एकर शेती आहे. मृतक त्यांच्या शेतीमध्ये १0 हजार रुपये महिन्याने शेतीतील कामे करीत होता. १७ जानेवारीला दुपारी ४ वाजता घरून निघून गेला. परंतु, घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता मिळाला नाही. याबाबत त्यांच्या पत्नीने १८ जानेवारीला कळमेश्‍वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु, २0 जानेवारीला दुपारी ४ वाजता सावंगी शिवारात मृतदेह आढळून आला. कळमेश्‍वर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
मृतकाच्या गळा व डोक्यावर असलेल्या जखमामुळे घातपात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून, अधिक तपास कळमेश्‍वर पोलिस करीत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.