पंचशील चाैकाजवळ मृतदेह आढळला
पेंटरचा आकस्मिक मृ्त्यू नागपूर : कृष्णधाम मानकापूर येथील रहिवासी अमलेश चरणदास मेश्राम (वय ४०) या पेंटरचा बेलतरोडीतील पृथ्वीधाम नगरात आकस्मिक मृत्यू झाला. देशमुख यांच्या घरी मेश्राम पेंटिंगचे काम करीत असताना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना उपचारासाठी नेले असता हॉस्पिटलसमोरच मेश्राम यांनी जीव सोडला. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा संशय आहे. ज्ञानेश्वर देवराव गेडाम (५२) यांनी दिलेल्या माहितीवरून बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.