29 जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार सर्वसाधारण अर्थसंकल्प

Share This News

संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने (सीसीपीए) अर्थसंकल्पी अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरु करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार 29 जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. पहिला भाग 29 जानेवारीपासून सुरू होईल आणि 15 फेब्रुवारीपर्यंत चालेल.

तसेच दुसरा भाग 8 मार्च रोजी सुरु होईल आणि 8 एप्रिलपर्यंत चालेल. संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे. 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील.

दरम्यान, कोरोना संकटामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन यावेळी रद्द करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते की, कोरोनच्या वाढत्या प्रकरणांमुळे यावेळीचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.