केंद्राकडून राज्यांना आतापर्यंत 16.33 कोटी निःशुल्क लसींचा पुरवठा

Share This News

नवी दिल्ली, 30 एप्रिल : केंद्र सरकारने आतापर्यंत देशातील राज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या 16 कोटी 33 लाख मात्रांचा निःशुल्क पुरवठा केलाय. कोरोनाच्या विरोधातल्या लढ्यात केंद्र सरकार अग्रस्थानी आहे. साथरोगाच्या विरोधातल्या भारत सरकारच्या पंच सूत्री धोरणाचा लसीकरण हा महत्वाचा स्तंभ आहे. (चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविडला प्रतिबंध करणारी वर्तणूक यांचा या पंच सूत्री धोरणात समावेश आहे.) कोविड-19 प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने अनेक ठोस पावले उचलली आहेत. शुक्रवारी सकाळी 8 वाजता प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत केंद्र सरकारने राज्यांना सुमारे 16.33 कोटी मात्रा मोफत पुरवल्या आहेत.यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून एकूण 15,33,56,503 मात्रा वापरण्यात आल्या. राज्यांकडे अद्यापही 1 कोटीपेक्षा जास्त मात्रा वापरण्यासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय येत्या 3 दिवसात राज्यांनी सुमारे 20 लाख मात्रा मिळणार आहेत. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.