केंद्राने व्हॉट्सअँपच्या सीईओंना सुनावले
दिल्ली
केंद्र सरकारने व्हॉट्सअँपच्या भारतातील सीईओंना नवीन प्रायव्हेसी पॉलिसीवरून कठोर शब्दात सुनावले आहे. इन्स्टंट मेसेजिंग अँप असलेल्या व्हॉट्सअँपने ४ जानेवारी रोजी आपल्या नव्या सेवा शर्ती (टर्म ऑफ सर्व्हिस) जाहीर करत सगळ्यांनाच धक्का दिला होता. ८ फेब्रुवारीपासून या सेवा शर्ती लागू केल्या जाणार होत्या. मात्र, हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअँपच्या नव्या प्राइव्हसी पॉलिसीबद्दल व्हॉट्सअँपचे सीईओ विल कॅथार्ट यांना पत्र पाठवले असून, कठोर शब्दात कानउघडणी केली आहे. व्हॉट्सअँप सेवेसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. व्हॉट्सअँपची प्रस्तावित सेवा आणि प्राइव्हसी पॉलिसी भारतीयांच्या आवडी आणि स्वायत्ततेबद्दल चिंताजनक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. प्रस्तावित बदल मागे घेण्याबरोबरच गोपनियता, वापरकर्त्यांच्या आवडीचे स्वांतत्र्य आणि माहिती याबद्दल पुनर्विचार करावा. भारतीयांचा योग्य सन्मान करायला हवा. व्हॉट्सअँपच्या सेवा शर्ती आणि प्राइव्हसी पॉलिसीमध्ये करण्यात आलेले एकांगी बदल योग्य आणि स्वीकारले जाणार नाहीत, असा इशारा केंद्राने व्हॉट्सअँपला दिला आहे.