‘ब्रेक द चेन’मध्येही संक्रमणाची ‘चेन’ कायम

Share This News

नागपूर
नागपूर शहर आणि जिल्ह्यात कोरानाचा प्रकोप कायम असून, संक्रमणाचा वेग कमी होताना दिसत नाही. दररोज सात हजारांपेक्षा जास्त बाधित जिल्ह्यात आढळून येत आहे. एप्रिल महिन्यात तर सलग पाचव्या दिवशी सात हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी सर्वांच्याच मनात धडकी भरविणारी आहे. शासनाने कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध लागू केल्यानंतरही बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. रविवारी (२५ एप्रिल) जिल्ह्यात ७ हजार ७७१ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ८७ बाधितांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २४ हजार ७0१ नमुने तपासण्यात आले. यापैकी १६ हजार ९३0 नमुने निगेटिव्ह आहेत. तर ७ हजार ७७१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ७ हजार ७७१ अहवालांपैकी ४ हजार ७२0 शहरातील, ३ हजार 0४0 ग्रामीण भागातील तर ११ अहवाल जिल्ह्याबाहेरील आहेत. आजपयर्ंत बाधितांची रुग्णसंख्या ३ लाख ७४ हजार ४८८ वर पोहोचली आहे. यातील २ लाख ७३ हजार ९५५ शहरातील, ९९ हजार 0४१ ग्रामीण भागातील तर १ हजार १९२ जिल्ह्याबाहेरील आहेत. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ८७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यातील ४६ शहरातील असून ३0 ग्रामीण भागातील तर ११ जिल्ह्याबाहेरील आहेत. आतापयर्ंत जिल्ह्यात एकूण मृत्यूसंख्या ६ हजार ९३६ वर पोहोचली आहे. यातील ४ हजार २४७ मृत्यू शहरातील, १ हजार ६७९ मृत्यू ग्रामीण भागातील तर १ हजार 0१0 मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहेत. रविवारी दिवसभरात जिल्ह्यात ५ हजार १३0 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यातील ३ हजार ३९२ शहरातील असून १ हजार ७३८ कोरोनामुक्त ग्रामीण भागातील आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुक्तांची संख्या २ लाख ८९ हजार ६९६ वर पोहोचली आहे. यातील २ लाख २२ हजार ३५0 शहरातील तर ६७ हजार ४८९ कोरोनामुक्त ग्रामीण भागातील आहेत. सध्या जिल्ह्यात ७७ हजार ५५६ सक्रीय रुग्ण आहेत. बाधितांची वाढती संख्या पाहता आणि मृत्यूसंख्येतील वाढ पाहता शहरासह आता ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मृत्यूसंख्या मागील पाच दिवसात दोन वेळा शंभरीपार गेली आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा आणि ऑक्सिजनसाठी होणारी धावपळ अजूनही सुरूच आहे. तर शासकीय रुग्णालयांमध्ये आयसीयू बेडच उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. खासगी रुग्णालयात तर गरीब रुग्णांना प्रवेशच नसल्याचे चित्र आहे. गरिबांना खासगी रुग्णालये बाहेरूनच परतवून लावत आहेत.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.