गितांजली एक्स्प्रेसचा डबा अकोल्याजवळ रूळावरून घसरला The coach of Gitanjali Express derailed near Akola

Share This News

अकोला : हावडा-मुंबई गितांजली एक्स्प्रेसचा डबा मंगळवार, ९ मार्चला अकोला जिल्ह्यात रूळांवरून घसरला. बोरगाव मंजू ते काटेपूर्णा रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात मंगळवारी सकाीळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घडला. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही.


डबा घसल्यानंतर गितांजली एक्स्प्रेसच्या गार्ड आणि लोको पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने अनर्थ टळला. अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या आणि नागपूरकडे जाणाऱ्या दोन्ही अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गितांजली एक्स्प्रेस हावडावरून मुंबईकडे जात होती. सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास ह रेल्वे बोलगाव मंजू रेल्वे स्थानकावजवळुन रवाना झाली. त्यावेळी रेल्वेचा शेवटचा एसएलआर डबा रूळांवरून घसरला. अप लाइनवर ही रेल्वे होती. डबा घसल्यानंतर तो डाउन लाइनपर्यंत गेला. गाडीच्या लोकोपायलटने तातडीने ब्रेक दाबले. त्यामुळे मोठा आवाज झाला. या आवाजामुळे गितांजली एक्स्प्रेसच्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. गार्ड आणि लोको पायलटने प्रसंगावधान दाखविल्याने गाडी तातडीने थांबली. घटनेची माहिती गार्ड आणि लोको पायलटने वॉकीटॉकीवरून बोरगाव मंजू व काटेपूर्णा स्थानकावरील रेल्वे स्टेशन्या उपव्यवस्थापकांना दिली. त्यानंतर बोरगाव मंजू, काटेपूर्णा, अकोला स्थानकावरून मदत पथकांना अपघातस्थळाकडे रवाना करण्यात आले. अप आणि डाउन दोन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक या अपघातामुळे प्रभावित झाल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अपघातामुळे रेल्वे ट्रॅकला नुकसान झाले आहे मात्र गितांजली एक्स्प्रेसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.