कोरोना संकट जगासमोर दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे आव्हान

Share This News

पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात फैलाव झालेल्या कोरोना महामारीला दुसर्‍या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे संबोधताना निर्णायक कृती करण्याचे आवाहन जागतिक नेत्यांना केले. मात्र ही कृती आर्थिक संकटातून मुक्तता, नोकर्‍या आणि व्यापारापुरतीच र्मयादित नसावी, असेही ते म्हणाले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे १५ व्या जी-२0 शिखर परिषदेत सहभागी होताना ते बोलत होते. ही परिषद सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. समाजाच्या सर्व स्तरांपयर्ंत तंत्रज्ञान पोहोचावे, कारभारातील पारदर्शकता, प्रतिभासंपन्न समूहनिर्मिती आदींचा समावेश असलेली कोविड-१९ नंतरची जागतिक सूची असावी, असे आवाहन मोदी यांनी केले. रिअलायझिंग द अपॉच्यरुनिटीज ऑफ ट्वेंटी फस्र्ट सेंचुरी फॉर ऑल, अशी या शिखर परिषदेची संकल्पना आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.