देशातील रोजची रुग्णसंख्या चार लाख पार, परिस्थिती अत्यंत गंभीर

Share This News

नवी दिल्लीः मे महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात नव्या कोरोना रुग्णांचा आकडा चार लाखांचा आकडा पार करून गेला आहे. मागील चोवीस तासात देशात सुमारे चार लाख २ हजार नव्या रुग्णांची भर पडली असून देशातील परिस्थिती खूपच चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे.
शनिवारी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार मागील चोवीस तासात देशात ३ हजार ५२३ रुग्णांचा मृत्यू झाला असून सुमारे तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे आढळून आले आहे. सध्या देशात ३२ लाख ६८ हजारांवर सक्रीय रुग्ण आहेत. तर एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १ कोटी ९१ लाखांवर पोहोचला आहे. २ लाख ११ हजार लोकांचा देशात आतापर्यंत कोरोनापायी मृत्यू झाला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.