नागनदीत बोटीतून प्रवासाचे स्वप्न नक्की पूर्ण होईल – नितीन गडकरी

Share This News

नागपूरच्या नागनदीतून बोटीद्वारे प्रवास करण्याचे स्वप्न एक दिवस नक्कीच पूर्ण होणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.हिंगणा टी पॉईंट ते छत्रपती चौक दरम्यानच्या रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम रविवारी पार पडला,यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.  नागनदीच्या विकासासाठी १७०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. अंबाझरीत बोटीत बसून नागनदीने पारडी पर्यंत जायायचे आहे पण यावर कुणाचा विश्वास बसणार नाही,परंतु मी एक दिवस नाग नदीतून बोटीद्वारे नक्कीच फिरवणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला. पुढील तीन वर्षात हे स्वप्न पूर्ण होणार असल्याचंही गडकरी यावेळी बोलाले. बोटीतून प्रवास करताना नाग नदीचे पाणी स्वच्छ राहणार आहे. नाग नदी स्वच्छता अभियान साठी २७ जानेवारीला दिल्लीत बळीराजा योजना,सिंचन योजना व जलशक्ती विभागाच्या मंत्र्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.