चालकाला लाखोंच्या गांजासह अटक

Share This News

नागपूर : गुन्हेशाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने दिल्लीतील उबेरचालकाला पारडी परिसरात सापळा रचून अटक केली. त्याच्याकडील २४ लाख रुपये किमतीचा १६० किलो गांजा जप्त केला. अजय खेमानंद भट्ट (वय ३०, रा. सोमबाजार विकासनगर, दिल्ली) हे अटकेतील तस्कराचे नाव आहे.
लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद झाल्याने तो बेरोजगार झाला. याचदरम्यान तो दिल्लीतील एका गांजातस्कराच्या संपर्कात आला. दिल्लीच्या तस्कराने त्याला विशाखापट्टणम येथून गांजाची खेप आणण्यास सांगितले. या मोबदल्यात त्याला २५ हजार रुपये देऊ केले. अजय कारने (एचआर-५५-व्ही-५५८३) विशाखापट्टणम येथे गेला. तेथून गांजाची खेप घेऊन तो दिल्लीला निघाला. गांजातस्कर दिल्लीला खेप घेऊन जाणार असल्याची माहिती गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांना मिळाली. फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाचे निरीक्षक सार्थक नेहते, सहाय्यक निरीक्षक सूरज सुरोशे, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्रसिंग बघेल, हेडकॉन्स्टेबल प्रदीप पवार, नामदेव टेकाम, विनोद गायकवाड, नितीन, राहुल पाटील व त्यांच्या पथकाने पारडीतील महालगाव कापसी उड्डाणपुलावर सापळा रचला आणि अजयला अटक केली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.