अमेरिकेतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची पहिली खेप पोहोचली दिल्लीत

Share This News

वॉशिंग्टन: करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचे भयावह चित्र निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठवले आहेत. न्यूयॉर्कहून भारतासाठी पाठविण्यात आलेली ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची पहिली खेप सोमवारी सकाळी दिल्लीत पोहोचली.
अमेरिकेसह इतर देशांकडूनही भारताला मदत पाठवण्यात येत आहे.एअर इंडियाच्या विमानातून दोन दिवसांत सहाशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भारतात दाखल होणार आहेत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खासगी संस्था, कंपन्यांनी अमेरिकन कंपन्यांकडून खरेदी केले आहेत. येत्या काही आठवड्यात एअर इंडियाच्या विमानातून खासगी संस्थांसाठी १० हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भारतासाठी दाखल होतील, असे सांगण्यात आले. भारतात मोठ्या प्रमाणावर लशींची निर्मिती होण्यासाठी अमेरिका लस निर्मितीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल, उपकरणे, कीट्स देखील तातडीने भारताला देणार आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.