शक्ती कायद्याच्या विधिमंडळ समितीची पहिली बैठक आज

Share This News

महिला व बालकांवर होणार्‍या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावी आणि गतिमान पद्धतीने कार्यवाही व्हावी, याकरिता प्रस्तावित शक्ती कायद्याची चौकट अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्यातील निमंत्रित महिला तसेच वकील संघटनांसोबत शक्ती कायद्यासंदर्भातील विधिमंडळ समितीच्या बैठका घेण्यात येणार आहे. या समितीची पहिली बैठक आज ११ जानेवारीला नागपुरातील विधान भवन येथे होणार असून, निमंत्रित महिला व वकील संघटनासोबत चर्चा होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे या बैठका होणार आहेत. यासाठी महिला संघटना व वकील संघटना या निमंत्रित राहणार आहेत. पहिली बैठक आज नागपूरमध्ये विधान भवन येथे होणार असून, १९ जानेवारी मुंबई येथे तर २९ जानेवारीला औरंगाबाद येथे या बैठका होतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. यासाठी संबंधितांनी आपले मत हे लेखी स्वरूपात आणावे. संबंधित तारखेला तीनही ठिकाणी दुपारी ३ वाजता निमंत्रित महिला संघटना तसेच सायंकाळी ५ वाजता वकील संघटना असे वेळ देण्यात आली आहे. हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलेले आहे. या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री आहेत. या विषयामध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्ती, महिलांच्या संघटना, विधिज्ञ, स्वयंसेवी संस्था आपल्या सूचना अथवा सुधारणा सुचवू शकतात.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.