गोंदिया : वृक्षतोड करणारे पाच आरोपी वनविभागाच्या जाळ्यात

Share This News

विपुल निसर्ग संपदेने नटलेला म्हणून तालुक्याची ओळख आहे. परिणामी वन विभागाच्या दुर्लक्षामुळे वृक्षांची अवैध कत्तल व विक्री तसेच वन्य प्राण्यांची शिकार हे सातत्याने होत आहे. अशातच तालुक्यातील रामघाट वनक्षेत्रातून अवैधरित्या सागाची वृक्षतोड करून वाहतूक करण्यात येत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारावर वनविभागाच्या पथकाने घातलेल्या धाडीत ५ आरोपींना ताब्यात घेत सुमारे १४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तालुक्यात आजही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वृक्षतोड व त्याची विक्री वन तस्करांकडून होत असते. कारवाई होत असली तरी वन तस्करांचे जाळे लांब असल्याने हा प्रकार अद्यापही थांबलेला नाही. अशातच का (ता.८) रात्री रामघाट -१ बीट येथून अवैधरीत्या सागवान वृक्षतोड करून वाहनाद्वारे वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच केलेल्या कारवाई दरम्यान रामघाट बिट कक्ष क्र. २५४ ब राखीव वन येथे वाहन क्रमांक एमएच.३५/एजे.१८0७, टाटाएस वाहनाद्वारे 0.३४८ घनमीटर सागाचे १३८0८ रुपये किमतीचे साग अवैधरित्या वाहतूक करत असताना पकडून आरोपींना वनकायद्यानुसार अटक करण्यात आली. आरोपींना आज (ता.९) न्यायालयात हजर करण्यात आले.अटक करण्यात आलेल्यामध्ये सूर्यभान तुकाराम राणे (५२) रा. माहूरकुडा, दुशंत मधुकर कापगते (२७) रा. निलज, मारुती सदाशिव मळकाम (६२) रा. अर्जुनी मोरगाव, संदीप मारुती मळकाम(२९) रा. अर्जुनी मोरगाव व पांडुरंग मोंगसु शहारे (६६) रा.अर्जुनी मोरगाव यांचा समावेश आहे. वन कायद्यांतर्गत या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.