गुड न्यूज…येत्या काही दिवसात ऑक्सीजनची अडचण दूर होणार

Share This News

नागपूरः कोरोनाग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात येत असून येत्या काही दिवसात ऑक्सीजनच्या उपलब्धतेची अडचण राहणार नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नागपुरात बोलताना व्यक्त केला.
नागपुरात भिलाई व अन्य ठिकाणाहून ऑक्सीजनचा पुरवठा होत आहे. भिलाईच्या स्टील प्लांटमधून ११० टन तर सेलच्या उपक्रमातून ३० टन असा १४० टन ऑक्सीजन उपलब्ध होत आहे. ऑक्सीजन नागपुरात आणण्यासाठी वाहतुकीची अडचण प्यारेखान या व्यवसायिकाने दूर केली आहे. त्यांची वाहने आता त्यासाठी उपलब्ध होणार आहेत. नागपुरात येणाऱ्या ऑक्सीजनचे विदर्भात अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा अशा सर्वच जिल्ह्यात वितरण होत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
नागपूर आणि विदर्भाची ऑक्सीजनची रोजची गरज २०० टन च्या आसपास असू इतरही ठिकाणाहून ऑक्सीजन उपलब्ध होत आहे. काही रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सीजन काढण्याची व्यवस्था उभारली जात आहे. त्यामुळे येत्या काळात ऑक्सीजनचही अडचण पूर्णपणे दूर होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
वर्धा येथे रेमडेसिवीरच्या उत्पादनास उद्यापासून सुरुवात होत आहे. रोज ३० हजार इंजेक्शन्स तयार होती. इंजेक्शनचा हा पुरवठा विदर्भात तसेच गरजेनुसार राज्याच्या इतर भागात केला जाणार आहे.
लोकांचे प्राण वाचविणे, याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभारल्या जात आहेत. संकटाचे स्वरुप मोठे असून लोकांना एकमेकांना मदत करावी, असे आवाहन करताना गडकरी यांनी कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरवात झाल्याचे संकेत मिळत असल्याचे सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.