राज्यपालांचा अवमान करून सरकारने पराक्रम केला-सुधीर मुनगंटीवार यांची टीका

Share This News

मुंबई : भारत देश पराक्रमी लोकांचा सन्मान करणारा देश आहे. लोक पराक्रमी लोकांना लक्षात ठेवतो, अन्याय करणाऱ्यांना नव्हे परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ऐनवेळी विमान सुविधा नाकारून अजब पराक्रम केला आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांना देण्यात येत असलेल्या वागणुकीबद्दल त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. राज्यपाल हे महाराष्ट्रातील घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांच्या उपस्थितीशिवाय राज्यातील अधिवेशनही सुरू होऊ शकत नाही, अशा व्यक्तीचा अवमान करून सरकारने काय साध्य केले, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्र सरकार राज्यपालांना विमानाची परवानगी नाकारल्याचे एक दिवस अगोदर कळविल्याचे सांगत आहे. ही बाब धादांत खोटी आहे. आपल्या माहितीप्रमाणे सरकारने एक दिवस अगोदर अशी कोणतीही सूचना राजभवनाला दिलेली नव्हती, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. ‘वा रे पराक्रम सरकार’ असा उल्लेख करीत मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा उपहास केला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.