भारतीयांपेक्षा अधिक लसी परदेशात पाठवल्याची कबुली सरकारनं UN समोर दिलीये, पण जर

Share This News

वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाहाधितांची संख्या ही तब्बल १२ कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान पुन्हा चिंताजनक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. दरम्यान, भारतात लसीकरणालाही सुरूवात झाली आहे. परंतु भारताकडून अन्य देशांनाही मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा केला जातोय. या धोरणावरून काँग्रेसनं भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “भारतानं आपल्या देशातील नागरिकांना जितके कोरोना लसीचे डोस दिले नाही त्यापेक्षा अधिक डोस परदेशांमध्ये निर्यात केलेत, असं भाजपा सरकारनं संयुक्त राष्ट्रासमोर कबुल केलं आहे. लसी निर्यात करण्यापेक्षा भारतीयांना प्राधान्य देत सरकारनं लसीकरण केलं असतं तर सध्या देशात दिसणारी कोरोनाची दुसरी लाट रोखता आली असती,” अशी जोरदार टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शामा मोहम्मद यांनी केली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.