कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकार कमी पडतयं – प्रविण दरेकर

Share This News

मुंबई दि. २६ एप्रिल आज विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व विधान परीषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत मुंबईत दोन कोविड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. कांदीवली येथील भुराभाई आरोग्य भवन कोविड सेंटर व नित्यानंद मनपा शाळा अंधेरी येथे रविंद्र जोशी फाउंडेशन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या कोविड केअर सेंटरचा लोकार्पण कार्यक्रम आज पार पडला. या निमित्ताने दरेकर बोलत होते. 
 दरेकर यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच लोकांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरबद्दल आमदार योगेश सागर यांचे व सेंटरच्या उभारणीत योगदान असलेल्या सर्वांना धन्यवाद दिले. दरेकर पुढे म्हणाले की, “ ठाकरे सरकार कोरोनावर मात करण्यात कमी पडत आहे. रूग्णांना बेडस् उपलब्ध होत नसल्यामुळे कुठे खुर्चीवर तर कुठे गाडीमध्ये, जमिनीवर रूग्णांना ऑक्सीजन लावण्यात येत आहे. म्हणूनच विरोधी पक्षनेते देवेंद्रजी व आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करीत आहोत.” 
 नागपूरचे उदाहरण देऊन दरेकर म्हणाले, “नागपूर येथे कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात येताच, देवेंद्रजीनी नागपूरात ठाण मांडून तेथील रूग्णसंख्या आटोक्यात आणली.” नागपूरात अशी परीस्थिती असताना नागपूरबरोबरच देवेंद्रजी मुंबईतही वेळ देतात. यावेळी त्यांनी दोन दिवसांपूर्वी घाटकोपर येथे झालेल्या कोविड सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमाचीही आठवण करून देत देवेंद्रजींचे आभार मानले.
 “महाराष्ट्रात व मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्य सरकार मात्र फक्त केंद्रावर टीका करण्यात व्यस्त आहे. एकीकडे सरकार केवळ आरोप करण्यात व्यस्त असताना आपल्यासारखे जनतेचे खरे प्रतिनिधी अहोरात्र मेहनत करून वेगवेगळ्या सुविधा जनतेला उपलब्ध करून देत आहात, अशीच मेहनत करून लवकरात लवकर राज्याला व पर्यायाने देशाला आपण कोरोनामुक्त करूयात!” असा विश्वासही दरेकर यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी दिला. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.