कृषी कायद्यात सुधारणा करण्यास सरकार तयार

Share This News

प्रकाश आंबेडकरांनी ‘एनडीए’मध्ये सहभागी व्हावे
आठवले यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच कॉंग्रेसमध्ये शरद पवार यांचे नुकसान झाले. त्यांनीही एनडीएत यावे असेही आवाहन यावेळी त्यांनी केले. मुंबई महानगर पालिका निवडणूक भाजपसोबत मिळून लढणार आहोत. यावेळ भाजप आणि आमची सत्ता येणार असून महापौर भाजपचा तर उपमहापौर आमचा होणार असल्याचा विश्‍वासही आठवलेंनी यावेळी व्यक्त केला.लोकशाही वार्ता / नागपूर
केंद्राच्या कृषी कायद्यावरुन दिल्लीत शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. या कृषी कायद्यात शेतकर्‍यांना ज्या सुधारणा हव्या असतील त्या सुधारणा करण्यास सरकार तयार आहे. परंतु कायदाच मागे घ्या, अशी भूमिका बरोबर नाही. सरकार कायदा मागे घेणार नाही, परंतु सुधारणा करण्यास तयार आहे, त्यासाठी शेतकार्‍यांनीही सरकारशी संवाद साधण्यास पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
रविवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ना. आठवले म्हणाले की, केंद्र सरकारने लागू केलेले तीनही कृषी कायदे शेतकर्‍यांचा हिताचे असून शेतकरी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीसोबतच त्याला जेथे जास्त नफा मिळत असेल अशा ठीकाणी विकू शकतो.आज या कायद्याविरोधात थंडीमध्ये शेतकरी आंदोलनावर आहेत. हे सर्व बघून आम्हालाही चांगले वाटत नाही. कृषी सुधार कायदे रद्द करण्याची मागणी विरोधक आणि शेतकरी संघटना करीत असले तरी या मागणीशी आम्ही सहमत नसून येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या संसदीय अधिवेशनात या कृषी
कायद्यात सुधारणा करण्याची आमची तयारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सरकारकडून आत्तापर्यंत ७ ते ८ बैठका घेण्यात आल्या असून शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधिंनी त्याला प्रतिसाद देणे गरजेचे आहे.शेतकर्‍यांचा भावनांशी आम्ही सहमत असून लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार हा सर्वांना आहे. शेतकरी आंदोलनावर अनेक भाजप नेते टीका करीत आहेत. या आंदोलनात चीन पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे, परंतु शेतकर्‍यांच्या या आंदोलनात चीन पाकिस्तान पोहोचूच शकत नाही, असे ही आठवले म्हणाले. पीयूष गोयल यांनी आंदोलनात माओवादी शिरल्याचे म्हटले आहे, याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता यावर आठवले म्हणाले, असे असेल तर त्याची निश्‍चितच चौकशी व्हायला व्हावी. पत्रपकार परिषदेला रिपाईचे (आठवले) प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर, महेंद्र मानकर, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.