सरकारने खर तर मोफत लस देणे गरजेचे – प्रकाश आंबेडकर

Share This News

पुणे 26 एप्रिल
सरकारने खर तर मोफत लस देणे गरजेचे आहे. त्या दराबाबत “लसीच्या दराबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का आहेत” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार पारिषदेत ते बोलत होते. 
 लसीबाबत भारताने लवकर निर्णय घ्यावा. लसीचे उत्पादन आपल्याकडे होत आहे. तरी लस आपल्याकडे महाग कशी ? सगळ्यांना १५० रुपयात लस द्यावी. असेही यावेळी म्हणाले. कोव्हिडंमुळे मी आठवड्याची मुदत देतो अन्यथा जिल्ह्याजिल्ह्यात धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले, बेड, हॉस्टेल ताब्यात घ्यावेत. जिथे दोन्ही नसेल तिथे प्रायव्हेट हॉटेल आणि हॉस्पिटल ताब्यात घ्या. होम क्वारंटाइनमुळेही संख्या वाढतीये. आपल्याकडे अजून तरी प्रत्येकाला स्वतंत्र खोली नाही. त्यामुळे एकत्रित पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्याची गरज आहे. मोदींवर निशाणा साधत ते म्हणाले, हाय कोर्ट काम करतंय तसं सुप्रीम कोर्ट करत नाही. पंतप्रधान निधीमध्ये किती निधी आला याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली नाही. माझ्या माहिती प्रमाणे हजार कोटींपेक्षा अधिक पैसे आले. काल पंतप्रधान मोदी यांनी या निधीचा वापर करू. असे सांगितल्यावर भाजपवाले त्यांची पाठ थोपटत आहे. पंतप्रधानांचे प्राधान्य बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवणे होते. शहा आणि मोदी यांनी मिळून २९४ सभा घेतल्या होत्या. कोविड वाढताना मोदी निरो सारखं वागत होते. रोम जळताना निरो व्हायोलिन वाजवत होता तसे यांचे लक्ष बंगालवर होते. आम्ही अपेक्षा करतोय तृणमुल काँग्रेसने तिथे पून्हा सरकार स्थापन करावं. असेही त्यांनी सांगितले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.