राज्यपालांनी घटनाप्रमुख म्हणून विधानसभा अध्यक्ष निवडीच्या संदर्भात विचारणा केली- मुनगंटीवार

Share This News

नागपूर:-

राज्यपाल राज्याचे संवैधानिक प्रमुख असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवड कधी करणार हा प्रश्न राज्यसरकारला विचारण्याचा अधिकार राज्यपालांना असल्याचं मत भाजप चे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे. विधानसभा अध्यक्ष निवड लवकर झाली तर अर्थसंकल्पीय अधिवेशन चालवणे सोयीचे होईल अस देखील ते म्हणाले आहेत.

राज्यपालांनी १२ आमदारांची निवड प्रक्रिया रखडवली असताना महाविकास आघाडीकडून आरोपी-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. या आधी जेव्हा राज्यात काँग्रेसची सत्ता होती,त्यावेळी सुद्धा २ वर्षे विधान परिषदेच्या आमदारांची निवड करण्यात आली नव्हती, त्यावेळी काँग्रेस काही बोलत नव्हती मग आताच विरोध का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आमदारांची निवड करणे हा राज्यपालांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे,यावर ते निर्णय घेतील.

नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागल्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता,त्यानंतर महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष निवडीच्या संदर्भात होणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. आगामी काळात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहेत,त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भात सरकारला विचारले आहे. या संदर्भात विचारले असता भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांची पाठराखण केली आहे. ते म्हणाले की राज्यपाल हे राज्याचे घटनाप्रमुख म्हणून विधानसभा अध्यक्ष निवडीच्या संदर्भात विचारणा करण्याची त्यांची जबाबदारी आहे. विधानसभा अधिवेशन घ्यायचे आहे, त्यामुळे अध्यक्षांच्या नियुक्तीचा प्रश्न पुढे येणे स्वाभाविक आहे.

अजब सरकार की गजब कहाणी:-

महाविकास आघाडी मधले मंत्री संजय राठोड कुठे गायब आहे यावर विचारले असता अजब सरकार की गजब कहाणी कहाणी म्हणत टीका केली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री कुठे आहेत,यासंदर्भात कुणालाही थांगपत्ता लागत नसला तरी त्यांचा पत्ता एकतर पोलीस सांगु शकतील, ते स्वतः सांगू शकतील, किव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगू शकतील असं म्हणत त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.