राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात | The Governor’s address marked the beginning of the budget session

Share This News

मुंबई,दि.01ः-  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यात 8 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण अशा विविध मुद्द्यांनी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विरोधकांनी मुद्दे शांतपणे मांडावे जेणेकरून गोंधळ होणार नाही असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे. तर सरकार अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाची नाटके करत आहे. राज्यातील वाढीव वीज बिल आणि संजय राठोड मुद्द्यावरून अधिवेशनात सरकारची गोची होणार हे सरकारला माहिती आहे. त्यामुळेच अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर हिंमत असेल, तर अविश्वास ठराव आणून दाखवा, असे खुले आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

वैधानिक विकास महामंडळावरून सरकार विरोधकांत जुंपली
राज्य सरकारने आतापर्यंत वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही याचे उत्तर द्यावे. असा जाब भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला विचारला. 72 दिवस झाल्यानंतर सरकार काहीच करत नाही. विदर्भ, मराठवाड्यात लोक राहतात हे सरकारच्या लक्षात आहे का असा घणाघात त्यांनी केला. त्यावर अजित पवारांनी उत्तर देताना म्हटले की 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग अजून मोकळा झालेला नाही. त्या आमदारांची ज्या दिवशी होईल त्याच दिवशी आम्ही वैधानिक विकास मंडळाची घोषणा करू. अजित पवारांच्या उत्तराला प्रत्युत्तर देताना अजित दादांचे पोटातले ओठात आले आहे. 12 आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातील लोक ओलीस ठेवले का त्यांनी? तेथील जनता तुम्हाला माफ करणार नाही असा प्रहार फडणवीस यांनी केला.

शेतकरी, महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डीझेलवर लागणारा कर, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि त्याचा संजय राठोड यांच्याशी कथित संबंध यावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. देशातील सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. केंद्र सरकारचा एकूण टॅक्स 32 रुपये आहे. राज्य सरकारनं 27 रुपये टॅक्स पेट्रोलवर लावला आहे. इंधन दरवाढीविरुद्ध नाना पटोलेंचे यांचे आंदोलन म्हणजे नाटक आहे. हे आंदोलन राज्य सरकारविरोधात असेल. असेही फडणवीस म्हणाले आहेत.

राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली सुरुवात

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषणाची सुरुवात करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना योध्यांना अभिवादन केले. महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सव यावर्षी साजरा केला जाणार आहे. सोबतच, राज्य सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या कामकाजाचे राज्यपालांनी कौतुक केले. धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य शासनाने प्रभावी काम केले आहे. राज्य सरकारने कोरोना संदर्भात मदतीसाठी कोरोना टास्क फोर्स स्थापन केले. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. कोरोना चाचणी साठी प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या आहेत.

जनआरोग्य योजनांची व्याप्ती वाढली

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला. कोरोना विरुद्धची लढाई सुरु असून राज्य सरकारनं मी जबाबदार ही योजना सुरु केलीय. कोरोना संदर्भातील आरोग्य संदर्भातील उपाययोजना वाढवण्याची गरज आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले. राज्यात 500 प्रयोगशाळा सुरु आहेत.

जीएसटीची माहिती

राज्यपालांकडून अभिभाषणात केंद्र सरकारकडून मिळालेल्या आणि येणे बाकी वस्तू व सेवा कराच्या परताव्याची माहिती जाहीर केली गेली. राज्य सरकारनं 26 जानेवारी 2020 ला शिवभोजन योजना सुरु केली गेली. शिवभोजन योजना यशस्वी झाली. शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी विक्रमी खरेदी केली. राज्य सरकारने धान उत्पादकांच्या खात्यात रक्कम जमा केली. राज्य सरकारनं कोरोना प्रादुर्भाव असल्याने अंगणवाडीत न येऊ शकणाऱ्या बालकांना आणि गर्भवती मातांना घरपोच शिधा पुरवठा केला. कोरोना काळात अर्थव्यवस्था ठप्प असतानाही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. शाळा बंद पण शिक्षण सुरू हा उपक्रम राबवण्यात आला. देशभरात दिशा अ‌ॅपच्या वापरात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे असेही राज्यपाल म्हणाले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.